न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जाने.) :- हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त रविवार (दि. २७) रोजी शिवसेना लोणावळा शहर विभाग क्रमांक १० च्या वतीने लोणावळा शहरातील रायवुड पार्क येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, मावळ विधानसभा समन्वयक बाळासाहेब फाटक, शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक सुनिल इंगुळकर, वाहतुक सेना जिल्हाध्यक्ष महेश केदारी, युवती सेना तालुका अधिकारी दिपाली भिलारे, युवासेना लोणावळा शहर प्रमुख तानाजी सुर्यवंशी, नगरसेवक शिवदास पिल्ले, नगरसेवक माणिक मराठे, नगरसेवक भरत हारपुडे, नगरसेविका सिंधु परदेशी, नगरसेविका कल्पना आखाडे, नगरसेविका अंजली कडू, उपशहरप्रमुख मनिष पवार, प्रकाश पाठारे, महिला आघाडी उपशहरसंघटक मनिषा भांगरे, ग्रामपंचायत सदस्या सोनाली भोईर, रंजना दळवी, विभाग प्रमुख मोहन मल्ला, कमर अन्सारी, मुबीन इनामदार, प्रसिद्धी प्रमुख विजय आखाडे, भा.वि.सेना चिटणीस प्रफुल रजपुत, उपविभागप्रमुख दिलीप गायकवाड, नागेश दाभाडे, विशाल गावडसे, वाहतुक सेना मावळ तालुका उपाध्यक्ष संजय मावकर, शहर अध्यक्ष मंगेश ढोरे, शाखा प्रमुख जितेंद्र राऊत, सरपंच किरण केदारी, प्रकाश कारके, शाखा प्रमुख संजय जाधव, शिवराज नाणेकर व सर्व शिवसैनिक आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते.
स्पर्धेसाठी लोणावळा शहरातील विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला. तसेच शाळेतील कलाशिक्षक व सर्व विद्यार्थ्यांचे पालक आवर्जून उपस्थित होते. चित्रकला स्पर्धेच परीक्षक म्हणून कलाशिक्षक चंद्रकांत जोशी, दतात्रय थोरात, नितीन तिकोणे, बोंद्रे, शिरीष बडेकर, पंकज भिलारे, युवा आर्टीस्ट ग्रुप व लोणावळा चित्रकार ग्रुप यांनी काम पाहिले.
स्पर्धेच आयोजन शिवसेना लोणावळा शहर उपशहरप्रमुख संजय भोईर, युवासेना मावळ विधानसभा समन्वयक शाम सुतार, शहर संघटक सुभाष डेनकर, समन्वयक जयवंत दळवी (जे डी), विभाग प्रमुख बाळासाहेब मोहोळ, विभाग संघटक शेखर कारके, उपविभागप्रमुख सचिन गोणते, शाखाप्रमुख अमोल शिंदे, शाखा प्रमुख सागर भोमे, उमेश कालेकर, प्रविण कदम, उपशहरसंघटक दिनेश यादव, गटप्रमुख रोहित ओझरकर व विभागातील सर्व शिवसैनिकांनी केले.











