न्यूज पीसीएमसी नेटवर्क
थेरगाव (दि. २८ जाने.) :- नागरीकांना आपल्या परिसरातील पाणी, स्वच्छता, वाहतूक, कचरा व आदी समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा व सुंदर स्वच्छ, स्मार्ट थेरगावसाठी काय उपाययोजना करता येतील? याबाबत आपल्या संकल्पना सुचविण्याकरीता थेरगाव परिसरात थेरगाव सोशल फाऊंडेशनची नुकतीच बैठक संपन्न झाली. यास नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला व चांगल्या सूचना केल्या.
प्रत्येकाने वेगवेगळ्या कल्पना मांडल्या. त्यामूळे या फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांना काम करण्यासाठी अधिक सोपे होईल, असे मत फाऊंडेशनचे प्रमूख अनिकेत प्रभू यांनी व्यक्त केले.
यावेळी जनसेवा फाऊंडेशनचे हरिष अप्पा मोरे, जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विष्णूपंत तांदळे, जेष्ठ पत्रकार आनिल वडघुले, पत्रकार बेलाजी पात्रे, आई फाऊंडेशनचे समीर मूल्ला, नंदू जाधव, रोटरीचे फडतरे मामा, ऊद्द्यान परिवारचे साळुंखे, खानविलकर काका, थेरगाव सोशल फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
आभार रोटरी क्लबचे गणेश बोरा यांनी मानले.















