न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- निगडीतील ओटास्कीम येथे आरोपी महिलेने अवैधरित्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची विक्री केली. याबाबत सामाजिक सुरक्षा विभागाला माहिती मिळाली. गुरुवारी दुपारी सामाजिक सुरक्षा विभागाने ओटास्कीम येथे छापा मारून कारवाई केली.
महिलेकडून एक लाख ४६ हजार ७५० रुपये किमतीचा पाच किलो ८७० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रदीपसिंग सिसोदे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी २६ वर्षीय महिलेला अटक केली आहे. तिला विक्रीसाठी गांजा पुरवणारा आबा पवार (वय ४०, रा. ओटास्कीम, निगडी. मूळ रा. जामखेड, अहमदनगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.