न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२१) :- राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरज माने व त्यांच्या पत्नी सरोज माने तसेच मनसेच्या माजी महिला शहराध्यक्षा सौ. निर्मला खैरे यांचा काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश करण्यात आला.
माने यांनी २००७ ची महापालिका निवडणूक काकडे पार्क भागातून तर, त्यांच्या पत्नी सरोज माने यांनी २०१७ ची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्याच तिकिटावर लढविली आहे. मनसेच्या माजी महिला शहराध्यक्षा सौ. निर्मला खैरे यांनी २००७ ची निवडणूक भाटनगर येथून तर २०१२ व २०१७ ची महानगरपालिका निवडणूक वाकड प्रभागातून लढविली आहे. त्यांनी २०१८ पर्यंत मनसेच्या महिला शहराध्यक्षा या पदावर काम केले आहे.
सुरज माने यांच्या समवेत चिंचवड गावातील सुधाकर पुरंदरे, अविनाश जाधव, रोहन हिवाळे, शिवाजी सरेकर, सिंध्दू लोणी,सोपान व्हेसे, बंडोपंत आवारे, ऋषिकेश भोसले, कल्पेश घुले, प्रितम गायकवाड, शिवा हेळवार, सुमित भोसले, रूक्षी, पॅडी, शाम जंगले, सुरज, तुषार पाटील, नातू पालांडे, सागर सावंत, प्रसाद लोखंडे, प्रभाकर आव्हाडे यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. काँग्रेस शहराध्यक्ष डॅा.कैलास कदम यांनी त्यांचे काँग्रेस चे उपरणे व पुष्पगुच्छ देऊन काँग्रेस पक्षात स्वागत केले.
या प्रसंगी माजी महापौर कविचंद भाट, शिक्षण मंडळाचे माजी सभापती अभिमन्यू दहितुले, युवक काँग्रेस चे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महिला काँग्रेस च्या शहराध्यक्षा सायली नढे, एन एस यु आय चे प्रदेश उपाध्यक्ष उमेश खंदारे, पिंपरी चिचंवड वाल्मिकी समाजाचे अध्यक्ष राजू परदेशी, के हरिनारायणन, नंदा तुळसे, स्वाती शिंदे, विश्वनाथ जगताप, तारीक रिझवी, झुबेर खान, अन्थोनी झेवीयर, नयन पालांडे, विजय ओव्हाळ, माऊली मलशेट्टी, हिराचंद जाधव, किरण नढे आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.