- दुकान, रिक्षा आणि कारची अनोळखी आरोपींकडून तोडफोड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १२ जानेवारी २०२२) :- रुपीनगर येथील रुबाब मेन्स वेअर या कपड्यांच्या दुकानात सोमवारी रात्री पावणे नऊ वाजता अनोळखी दोघेजण आले. त्यांच्याकडील कोयत्याचा धाक दाखवून फिर्यादी यांच्याकडून हप्ता चालू करण्याची मागणी करत दुकानाची तोडफोड करण्याची धमकी दिली.
फिर्यादी यांनी मालकाला विचारून सांगतो असे सांगितले असता आरोपींनी दुकानाच्या काउंटर आणि प्रवेशद्वाराच्या काचा फोडून नुकसान केले. त्यांनतर दुकानासमोर पार्क केलेल्या रिक्षा आणि कार अशा दोन वाहनांची देखील तोडफोड करून नुकसान केले.
रोहन चरणदास लोट (वय २४, रा. रुपीनगर, तळवडे) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अनोळखी तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.