न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२२) :- चिंचवड स्टेशन येथील सामाजिक कार्यकर्ते गोरख लक्ष्मण शिंदे (वय ६५) यांचे आज गुरुवारी (दि. १३) रोजी पहाटे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी चार वाजता मोरवाडीतील ऑटोक्लस्टर जवळील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. भाजप नगरसेवक शीतल शिंदे यांचे ते वडील होत.