- दिवसा-रात्री अपघाताची शक्यता; पाईप हटविण्याची नागरिकांची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जानेवारी २०२२) :- पिंपळे सौदागर येथील क्रांती चौक परिसरातील पाण्याच्या टाकी शेजारच्या रस्त्याच्या कडेला लोखंडी पाईप टाकली आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहने चालवणे धोकादायक झाले आहे.
या रस्त्यावरून वाहने भरधाव वेगाने जात असतात. त्यामुळे दिवसा-रात्री अपघाताची शक्यता वाढली आहे. पालिकेने हे लोखंडी पाईप रस्त्यावरून उचलावेत अन्यथा मोठी दुर्घटना घडू शकते, अशी मागणी स्थानिक नागरिक करू लागली आहेत.