न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जानेवारी २०२२) :- पीडित महिलेचा घटस्फोट झाला असून, पीडित महिलेचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. पीडितेने दुसरे लग्न करण्यासाठी मॅट्रिमोनी वेबसाईटवर नाव नोंदणी केली होती. त्या वेबसाइटच्या ॲपवरून पीडितेची आणि आरोपीची ओळख झाली.
आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर पीडितेसोबत वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. आरोपीने वेगवेगळी कारणे सांगून पीडित फिर्यादी महिलेकडून एक लाख ९० हजार रुपये रोख व एक लाख ७० हजार रुपये ऑनलाइनद्वारे घेतले.
पीडित फिर्यादी महिला ३० सप्टेंबर २०१९ रोजी घरी नसताना फिर्यादीने त्याच्याकडील चावीने घर उघडून घरातून तीन लाख रुपये सोन्याचे दागिने फिर्यादीच्या नकळत घेतले. तसेच ते दागिने परत न देता फसवणूक करून अपहार केला. तुझे फोटो माझ्याकडे आहेत, ते मी तुझ्या घरच्यांना शेअर करेल, असे बोलून आरोपीने फिर्यादी महिलेला धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे. ऑगस्ट २०१९ ते १४ जानेवारी २०२२ या कालावधीत पिंपळे सौदागर येथे ही घटना घडली. पीडित ३७ वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि. १४) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दीपक आत्माराम शेंडगे (रा. भोसरी) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.