- ओमायक्रोनचे ३ नवीन रुग्ण; ९७ रुग्णांची मुक्तता…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज रविवारी (दि. १६) रोजी २६२६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १५३५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या २९९९९४ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २८१११९ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५३० जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.
आज ओमायक्रोनचे ३ नवीन रुग्ण आढळलेले आहेत. हे तिन्ही ०३ पुरुष रुग्ण आहेत. या रूग्णांपैकी १ रूग्ण बांगलादेश, १ रूग्ण सौदी अरेबीया व १ रूग्ण सहवासातील तपासणीमध्ये ओमायक्रॉन बाधित आढळून आलेले असुन या रुग्णांना रुग्णालयात दाखल करुन घेण्याची कार्यवाही सुरु आहे. या रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. एकूण १०८ कोविड-१९ पॉझिटीव्ह रुग्णांपैकी ९७ रुग्णांची पुन्हा १० व्या दिवशी कोविड १९ ची तपासणी करण्यात आली असता कोविड १९ तपासणीचा अहवाल नकारात्मक आला असुन या रुग्णांना घरी सोडुन गृहविलगीकरणात ठेवण्यात आलेले आहे. उर्वरित परदेशी प्रवाशांची कोविड १९ तपासणी करण्याचे कामकाज चालू आहे.