न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १६ जानेवारी २०२२) :- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास त्या पैशांवर १५ दिवस ते एक महिना या मुदतीत १० ते २० टक्के परतावा देतो अथवा गुंतवणूक केलेले पैसे दामदुप्पट करून देतो, असे फिर्यादीला आमिष दाखवले. त्याआधारे फिर्यादीचा आरोपींनी विश्वास संपादन केला. फिर्यादीकडून ५३ लाख नऊ हजार ९९४ रुपये घेऊन त्या पैशांचा मोबदला ठराविक दिवसात दिला नाही.
तसेच दामदुप्पट रक्कमही दिली नाही. फिर्यादी यांच्या नावावर एकही शेअर खरेदी केला नाही. आरोपी पैसे देतील असा विश्वास असल्याने फिर्यादी यांनी दोन वर्षे वाट पाहिली. शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १ एप्रिल २०१९ ते ४ नोव्हेंबर २०१९ दरम्यान घडली.
मेघनसिंह अमरसिंह पाटील (वय २७, रा. इस्लामपूर, ता. वाळवा, जि. सांगली) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात शनिवारी (दि. १५) फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुमेघ जोशी (रा. मंत्री कॉलनी, इस्लामपूर, जि. सांगली), त्याची पत्नी (रा चापेकर चौकाजवळ, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक संतोष शिंदे तपास करीत आहेत