- फुगेवाडी ते महापालिका मेट्रोने केला प्रवास…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
(पिंपरी दि. १७ जानेवारी २०२२) :- पुणे मेट्रोचे काम सध्या जलदगतीने सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तर मेट्रोच्या यशस्वी चाचण्याही झाल्या आहेत. पिंपरीतील फुगेवाडी स्टेशनला राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी भेट दिली. फुगेवाडी ते पिंपरी-चिंचवड महानगरपालिका असा मेट्रोने प्रवासही केला आहे.
शहरातील पुणे महामेट्रोच्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गाचे ९० टक्के काम मागच्या वर्षी पूर्ण झाले होते. २०२२ च्या जानेवारी व फेब्रुवारी महिन्यात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गावर मेट्रो धावणार होती.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी मार्गावर महामट्रो सुरूवातीला दररोज दैनंदीन पद्धतीने चालवली जाणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका मुख्यालय ते फुगेवाडी या मार्गावर एकूण पाच स्थानकांचा समावेश आहे. लवकरच नागरिकांना या मेट्रोने प्रवास करता येणार आहे.