न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२२) :- गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. रविवारी ४६७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
शहरात अडीच हजारांहून अधिक कोरोनाबाधित आढळून येत आहेत. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचे आदेश प्राप्त झाले आहेत. पोलिसांनी केलेली कारवाई पुढीलप्रमाणे :-
एमआयडीसी भोसरी (२३), भोसरी (४४), पिंपरी (४१), चिंचवड (४९), निगडी (६८), आळंदी (४९), दिघी (८५), सांगवी (१७), वाकड (३०), देहूरोड (८), तळेगाव दाभाडे (१०), रावेत चौकी (४), शिरगाव चौकी (६), म्हाळुंगे चौकी (३३) चाकण, हिंजवडी, तळेगाव एमआयडीसी, चिखली पोलीस ठाण्याच्या हद्दीन विनामास्कची एकही कारवाई करण्यात आली नाही.
















