न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२२) :- १२ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचे कोविड-१९ लसीकरण मार्च महिन्यापासून सुरू होणार आहे. लसीकरणावरील राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे प्रमुख एन.के. अरोरा यांनी ही माहिती दिली आहे.
३ जानेवारीपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात झाली होती. जानेवारी अखेरपर्यंत सर्व ७.४ कोटी मुलांना लसीचा पहिला डोस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यानंतर मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून १२ ते १५ वयोगटातील बालकांचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे.












