- रामनगरमधील घटना; आरोपी अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १७ जानेवारी २०२२) :- रामनगर येथील बस स्टॉपच्या बाजूला पीडित महिला चायनीजची गाडी चालवते. शनिवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी हा महिलेच्या चायनीजच्या गाडीवर आला. तो तिथे सिगारेट पिऊ लागल्याने फिर्यादी यांच्या बहिणीने त्यास येथे सिगारेट पिऊ नको असे सांगितले.
या कारणावरून आरोपी हा फिर्यादी यांच्या बहिणीच्या अंगावर धावून गेला. त्यावेळी फिर्यादी यांनी अंगावर जाऊ नकोस लांबून बोल, असे सांगितले. त्यामुळे आरोपीने फिर्यादी महिलेला शिवीगाळ करत त्यांचा विनयभंग केला.
हा प्रकार शनिवारी (दि. १५) रात्री चिंचवड येथे घडला. पीडित महिलेने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. समीर देवकर (वय २०, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.












