- दगडाने ठेचून चेहरा छिन्नविच्छिन्न; पोलिसांकडून तपास सुरु…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१८ जानेवारी २०२२) :- भोसरीतील गुळवे वस्ती येथे तरुण जखमी अवस्थेत पडला असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
एका तरुणाच्या अंगावर धारदार शस्त्राने वार केल्याचे आढळले. ओळख पटू नये यासाठी दगडाने चेहरा ठेचून विद्रुप केल्याचे समोर आले. सोमवारी (दि. १७) रात्री उशिरा घटना उघडकीस आली. खून झालेल्या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नाही. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
















