- बापाची पोलिसात तक्रार; मुलगा गजाआड…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१८ जानेवारी २०२२) :- पत्नीचे एटीएम कार्ड आरोपी मुलाकडे होते. एटीएम कार्ड फिर्यादी यांनी परत मागितले. त्याचा राग आल्याने आरोपी मुलाने स्वतःच्या बहिणीवर कोयत्याने वार करून जखमी केले. हा प्रकार रविवारी (दि. १६) रात्री साडेअकरा वाजता पिंपळे सौदागर येथे घडला.
रविकर शंकर हरकरे (वय ६९, रा. पिंपळे सौदागर) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुलगा राजीव रविकर हरकरे (वय ४१, रा. पिंपळे सौदागर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
















