- विविध मागण्यांबाबत शहर मनसेचे निगडीत आंदोलन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१८ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड शहरातील पहिला पुतळा, अशी ओळख असणारा निगडी प्राधिकरणातील मुख्य चौकातील सिग्नलजवळील लोकमान्य टिळकांचा अर्धाकृती पुतळा अद्यापही दुर्लक्षित आहे.
हा पुतळा आहे त्याच जागी पूर्णाकृती करा, तसेच परिसर सुशोभित करावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर मनसेच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे पत्राद्वारे अनेकवेळा करण्यात आली. मात्र, या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी आज मंगळवारी (दि. १८) रोजी निगडीत आंदोलन करण्यात आले. मनसेच्या वतीने क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे, स्थापत्याचे मुख्य कार्यकारी अभियंता रविंद्र पवार यांना पुन्हा निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले, उपशहराध्यक्ष बाळा दानवले, मनविसे अध्यक्ष हेमंत डांगे, जगन्नाथ वैद्य – मा.अध्यक्ष जेष्ठ नागरिक संघ, विभाग अध्यक्ष मयुर चिंचवडे, संघटक कांबळे, उपविभाग अध्यक्ष ओंकार पाटोळे, उपविभाग अध्यक्ष आशिष चव्हाण, स्वाती दानवले – अध्यक्ष महिला प्राधिकरण विचार मंच निगडी प्राधिकरण, भागवत नागपुरे, शंतनु चौधरी, प्रसाद मराठे, गणेश काळभोर, रोहित शिंदे, धनंजय देशमुख, नाना काळभोर, रोहन कांबळे आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.


















