- नगरसेवक नखाते व नगरसेविका तापकीर यांचा यशस्वी पाठपुरावा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१८ जानेवारी २०२२) :- रहाटणी चौकातील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ समारकाच्या कामास प्रारंभ झाला झाला आहे. सिमेंट काँक्रेटद्वारे स्लॅप भरण्याच्या कामाचे उद्घाटन नगरसेवक चंद्रकांत आण्णा नखाते व राजदादा तापकीर यांच्या शुभहस्ते श्रीफळ फोडुन करण्यात आले.
याप्रसंगी स्थापत्य विभागातील अधिकारी वर्ग व समस्त रहाटणीगांव ग्रामस्थ व सर्व शिवभक्त उपस्थित होते. नगरसेवक चंद्रकांत नखाते व नगरसेविका सौ. सुनिताताई तापकीर यांच्या पाठपुराव्याने काम पूर्णत्वास येत आहे.


















