न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१८ जानेवारी २०२२) :- शहरात आज ३१५९ कोरोनाबाधित; एकाचा मृत्यू; १७१२ रुग्ण कोरोनामुक्त…
पिंपरी-चिंचवड शहरात आज मंगळवारी (दि. १८) रोजी ३१५९ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या १७१२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३०५५१८ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २८४१०२ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५३२ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०१ एवढी आहे.















