न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (१८ जानेवारी २०२२) :- कोरोना महामारीचा संपूर्ण देशात अनेक राज्यांसह शहरातील नागरिकांना सामना करावा लागत आहे. त्यात आता कोरोनाची तिसरी लाट उफाळून आली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता सरकारने १५ ते १८ वयोगटासाठी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला. ३ जानेवारी पासून याची अंमलबजावणीही होत आहे.
पण वेगाने लसीकरण होण्यासाठी शहरातील वाकड भागामध्ये लसीकरण केंद्र असणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने वाकडमधील आबाजी रामभाऊ भूमकर प्राथमिक शाळा, भूमकर वस्ती, वाकड येथे १५ ते १८ वयोगटातील मुला मुलींसाठी लसीकरण केंद्र सुरु करावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, विरोधी पक्षनेते राजु मिसाळ, माजी विरोधी पक्षनेते नगरसेवक विठ्ठल काटे, प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, शहर उपाध्यक्ष संतोष वाघेर पाटील, शहर सरचिटणीस चेतन फेंगसे आणि अक्षय माछरे उपस्थित होते.


















