न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२२) :- चार वर्षांचा मुलगा स्वर्णव अखेर आठ दिवसांनी सापडला आहे. त्याचं बालेवाडीतून अपहरण झालं होतं. पुणे पोलिसांची जवळपास साडे तीनशेच्यावर पोलीस कर्मचारी व अधिकारी या मुलाचा शोध घेत होते. अखेर आज पुनावळे येथे पोलिसांना त्याला शोधण्यात यश आले.
दरम्यान त्याचे कशासाठी अपहरण केलं? कारण काय? पोलिस शोध घेत आहेत. गेले आठ दिवस सोशल मीडियावर अनेक ठिकाणी फोटो पाठवून तपास सुरू होता. बाणेर येथील हाय स्ट्रीट रस्त्यावरील इंदू पार्क सोसायटीजवळील उद्यानाजवळून मंगळवारी (दि. ११) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास स्वर्णव ऊर्फ डुग्गु सतीश चव्हाण (वय ४ वर्षे) यास एक मुलगा डे केअरला सोडविण्यासाठी पायी घेऊन जात होता.
त्यावेळी आलेल्या एका व्यक्तीने मोठ्या मुलाच्या हाताला झटका देऊन स्वर्णवला गाडीवरुन उचलून नेत त्याचे अपहरण केले होते. हा प्रकार बालेवाडी पोलिस चौकीपासून अगदी हाकेच्या अंतरावर घडला. याप्रकरणी मुलाच्या आई – वडीलांनी चतुःशृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.















