न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२२) :- महापालिकेच्या बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंञण विभागाने आज बुधवारी (दि. १९) रोजी चिखली, सोनवणे वस्ती गट नं. १३२५ मधील अनधिकृत आर.सी.सी. इमारत व इंडस्ट्रीयल पत्राशेडवर निष्कासनाची कारवाई केली.
या कारवाईचे एकूण क्षेञफळ अंदाजे ४५१५६.०० चौ.फु. (४२६०.०० चौ.मी.) आहे. ही कारवाई सह शहर अभियंता मकरंद निकम तसेच कार्यकारी अभियंता संजय घुबे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता सुधीर मोरे, उप अभियंता सुर्यकांत मोहिते, कनिष्ठ अभियंता विश्वनाथ राऊत व इतर २, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक १९, क, ई व फ क्षेत्रिय कार्यालयाचे अतिक्रमण पथक, अतिक्रमण विभागाचे १० पोलिस कर्मचारी, चिखली पोलिस स्टेशनचे पी.एस.आय १, पोलीस कर्मचारी २, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडाळाचे सुरक्षारक्षक ८५, वैद्यकिय विभागाची रुग्णवाहिका, विद्युत विभागाचे कर्मचारी, मजूर २०, जे.सी.बी १, पोकलेन ३, जॉ-कटर १ यांचे सहाय्याने करण्यात आली.


















