- कामगारांनी पेढे वाटून अन् आतषबाजी करीत साजरा केला आनंदोत्सव…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १९ जानेवारी २०२२) :- चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे येथील ट्रॅक कंपोनंट लि. व स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यामध्ये झालेल्या वेतनवाढ करारावरती आमदार महेश लांडगे व रोहिदास गाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.
कासारवाडी येथे हा कार्यक्रम पार पडला. ट्रॅक कंपोनंट लि. या कंपनीकडून वेतनवाढ घेण्यासाठी स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेने पुढाकार घेतला. कामगारांचे हित लक्षात घेत कंपनीने देखील कामगारांना भरघोस पगारवाढ जाहीर केली. पिंपरी-चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे हे स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे प्रमुख सल्लागार आहेत. त्यांच्यासह प्रमुख सल्लागार रोहिदास गाडे पाटील, स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटनेचे अध्यक्ष जीवन येळवंडे याकामी पुढाकार घेतला आहे.
१२ हजार ५०० रुपये प्रत्यक्ष पगार वाढ ही पहिल्या वर्षी ८० टक्के दुसऱ्या वर्षी १० टक्के आणि तिसऱ्या वर्षी १० टक्के मिळणार आहे. कराराचा कालावधी तीन वर्षांचा राहणार आहे. मेडिक्लेम पॉलीसी, बफर पॉलीसी, मृत्यू साहाय्य योजना, ग्रुप एक्सीडेंट पॉलिसी, सूटया :- PL – १५, SL – ०८, CL – ०८, PH – १०, तसेच, मतदानाची सुट्टी सरकारी आदेशानुसार राहील. F) शॉर्ट लिव्ह – एका महिन्यात दोन वेळा देण्यात येणार आहे. दिवाळी बोनस:- १५ हजार २०० रुपये आणि एक भेटवस्तू, वैयक्तिक कर्ज सुविधा, वार्षिक स्नेह संमेलन, प्रत्येक कामगाराला प्रत्येकी ९ महिन्याचा फरक देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वाभीमानी श्रमिक कामगार संघटनेचे जीवन येळवंडे यांनी दिली. कंपनीचे सी.ई. ओ. राजेश खन्ना यांनी उपस्थित कामगार व व्यवस्थापन यांना मोलाचे मार्गदर्शन केले. कामगारानी पेढे वाटून फटाक्याची अतिषबाजी करुण आनंद व्यक्त केला.


















