न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जाने.) :- प्रहार अपंग क्रांती आंदोलन संस्था आणि नागरवस्ती विकास योजना विभागाची एकत्रित सभा पार पडली होती. या सभेचा वृृत्तांत घेण्यासाठी पदाधिकारी बुधवारी (दि. ३०) रोजी या विभागात आले होते.
सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडून ही माहिती मिळणे अपेक्षित होते. त्याकरिता महापालिका मुख्यालयाच्या तळमजल्यावर असलेल्या नागरवस्ती विभागात हे सर्व पदाधिकारी त्यांची भेट घेण्यासाठी आले होते.
मात्र, याठिकाणी एकही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने दोन तास वाट पाहिली. त्यानंतर मात्र, या पदाधिकाऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत झाला. या पदाधिकाऱ्यांनी बाहेरून एक हार मागवून सहाय्यक आयुक्त स्मिता झगडे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध केला.











