न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२२) :- भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिन शिवसेनेच्या वतीने मोरेवस्ती, म्हेत्रेवस्ती, ताम्हाणेवस्ती व परिसरात उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेनेचे पुणे जिल्हा समन्वयक राहुल भोसले, सर्जेराव आबा भोसले तसेच शिवसेना शाखा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ज्ञानदा प्रशाला, राजर्षी शाहू, नूतन प्रशाला, संत तुकाराम मनपा शाळेत खाऊ वाटप व विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी शहर संघटक सचिन सानप, उपशहरप्रमुख अनिल सोमवंशी, भोसरी विधानसभा संघटक रावसाहेब थोरात, भोसरी विधानसभा समन्वयक ऋषिकेश जाधव, शिवसेना नेते नेताजी काशिद, विभागप्रमुख सतीश डीसले, शाखाप्रमुख अनंत हिंगे, हरिभाऊ लोहकरे, सुखदेव देवकर, अशोक गायकवाड, अनंत मते, विजय शिवपूजे, उपविभाग प्रमुख संजय गाढवे, दादाराव ठाकरे, चंद्रकांत जाधव, युवासेना युवाधिकरी देवा कुलकर्णी, गणेश सरवदे, अरविंद, सागर साबळे, गणेश सरवदे, पवन मस्के, राम पाटील, ओम हळनर, संतोष सरवदे, महेश भांडवालकर, आषिक यादव, सागर लोखंडे, ऋषिकेश सुर्वे, रुपेश म्हस्के अण्णा गुंड आदी उपस्थित होते.