- आ. महेश लांडगे यांची उपस्थिती; अमित गोरखे यांची संकल्पना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २६ जानेवारी २०२२) :- नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल तर्फे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नोव्हेल सर्कल चौकाचे लोकार्पण करण्यात आले. नोव्हेल इंटरनॅशनल स्कूल तर्फे बर्ड व्हली उद्यानासमोरील चौकाचे “व्यावसायिक सामाजिक जबाबदारी ” (CSR) अंतर्गत सुशोभिकरण करण्यात आले.
या सुशोभिकरणा अंतर्गत बसविण्यात आलेल्या शिल्पाला “आरोहण” असे संबोधन्यात आले असुन, त्याद्वारे मुलींच्या शिक्षणा संदर्भात योग्य व अचुक असा संदेश नागरिकांना दिला जात आहे. बदलत्या काळात जर मुलींना आपले आयुष्य घडवायचे असेल तर शिक्षण हिच खरी त्यांची ताकद आहे आणि त्याद्वारे ते एखाद्या पक्षाप्रमाणे स्वछंदीपणे उंच भरारी घेउन आपले भविष्य उज्वल करु शकतात.
संकल्पना अमित गोरखे यांची असून शिल्पाची रचना व निर्मिती पुणे येथील प्रसिध्द शिल्प्कार वैशाली कागदे व उल्हास कागदे यांनी केलेली आहे. शिल्पाच्या उदघाटन प्रसंगी आ. महेश लांडगे, संस्थेचे अध्यक्ष अमित गोरखे, महापौर उषा उर्फ माई ढोरे, नगरसेविका अनुराधा गोरखे, नगरसेवक तुषार हिंगे, विलास जेउरकर, सदाशिव खाडे, पक्षनेते नामदेव ढाके, केशव घोळवे, समीर जेऊरकर आदी उपस्थित होते.