न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२२) :- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून अनाथ आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना ब्लॅंकेट आणि संविधानच्या पुस्तकांचे वाटप केले.
संविधान दिल्याने मुल भविष्यातील जबाबदार नागरिक होतील. मुलांना लहान वयातच संविधानाचे बाळकडू दिले तर ते भविष्यातील अधिक जबाबदार नागरिक बनतील आणि पर्यायाने गुन्हेगारीलाही आळा बसेल, असा विश्वास आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी व्यक्त केला.
दरम्यान, चॉकलेट, ब्लँकेट आणि संविधानाची प्रत दिल्याने मुले भारावून गेली होती. यावेळी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, सतीश माने, मनीष कल्याणकर, जोगदंड, चव्हाण आदी उपस्थित होते.


















