- पोलिसांकडून दापोडी परिसरात कारवाई…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२२) :- ब्राऊन शुगर आरोपीकडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पुण्याकडून नाशिक फाट्याकडे जाणाऱ्या दापोडी बीआरटी बसथांब्यासमोर पोलिसांनी सापळा रचला.
आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे २८ ग्रॅम वजनाचे एक लाख चाळीस हजार रुपये किंमतीचे ब्राऊन शुगर व पाचशे रुपये रोख आढळून आले. आरोपीने ब्राऊन शुगर एकाकडून विकत आणले असून ते दुसऱ्याला विकणार असल्याचे तपासात समोर आले आहे.
आकाश बाळासाहेब फाटे (वय २२, रा. कोपरखैरने, ठाणे, सध्या रा. साफेगावनगर बदलापूर पूर्व), रोहन पाटील (रा. कोपरखैरणे, ठाणे), सौरभ पाटील (रा. खडकी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. आकाश फाटे याला पोलिसांनी अटक केली आहे.
















