न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२२) :- पिंपरी-चिंचवड शहरात आज गुरुवारी (दि. २७) रोजी २३८६ जणांना कोरोनाची बाधा झालेली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या ४०९२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या ३३९९४७ वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ३०९२५६ वर पोहोचली आहे. आजपर्यंत शहरातील कोरोनामुळे ४५५१ जणांचा मृत्यू झालेला आहे. पिंपरी चिंचवड हद्दीमधील आज मृत झालेली रुग्णसंख्या ०३ एवढी आहे.
















