- स्व. बाळासाहेब ठाकरे जयंतीनिमित्त मास्क, सतरंजी, शैक्षणिक साधनांचे वाटप…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २७ जानेवारी २०२२) :- भारतीय प्रजासत्ताक दिन व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या सप्ताह निमित्ताने चिंचवडगाव येथील वेताळनगर शाखेमध्ये ध्वजारोहण करण्यात आले.
शिवसेना शाखा वेताळनगर च्यावतीने अंगणवाडीतील बालकांसाठी मास्क, सतरंजी, शैक्षणिक साधने व खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी चिंचवड शहर सेनेचे शहर प्रमुख नगरसेवक सचिन भोसले, शहर संघटिका उर्मिला काळभोर, जिल्हा संघटिका वैशाली मराठे, चिंचवड विधानसभा प्रमुख अनंत कोऱ्हाळे, विभाग प्रमुख श्रीमंत गिरी, माऊली जगताप, रमेश शेंडगे, सुदाम कसबे, अविनाश आरसूळ, दिलीप अनिवाल, मुस्तफा शेख, राहुल काळे, अभिषेक तेलंगे, सुमित शिवशरण, श्रीकांत पाटील, स्वप्निल गायकवाड, कलावती नाटेकर, माया कुलथे, विनया शहाने, सुनंदा पवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन शहर संघटक संतोष सौंदणकर, माजी शाखाप्रमुख शिवाजी तांबे, कुदरत खान, शाखाप्रमुख माजिद शेख, राजेश आरसुळ, किशोर सातपुते यांनी केले होते.
















