न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जानेवारी २०२२) :- महिलेची पॅथॉलॉजी लॅब आहे. त्यांना अभिषेक गुप्ता या नावाने मोबाईलवर फोन आला. आपण संरक्षण दलात कार्यरत असून सध्या पुणे विमानतळ येथे आहे. तिथे सहा जणांची रक्ताची चाचणी करायची असल्याची विनंती केली. प्रत्येकी तीन हजार रुपये असे १८ हजार रुपये होतील, असे सांगितले. त्यानुसार गुप्ता याने नऊ हजार पाठवणार असल्याचे सांगून त्याचे सीआयसीएफचे ओळखपत्र पाठवून तो संरक्षण दलात कामाला असल्याबाबत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर त्याने महिलेच्या गुगल पे क्रमांकावर खात्री करण्यासाठी पाच रुपये पाठवते का, याची खात्री करण्यासाठी त्याने फोन करून फोन सुरू असताना महिलेच्या बँक खात्यातून पहिल्यांदा नऊ हजार रुपये व नंतर ३६ हजार रुपये असे एकूण ४५ हजार रुपये काढून घेतले.
याबाबत महिलेने गुन्हा दाखल करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला असता न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याबाबत २४ जानेवारीला आदेश दिले. याप्रकरणी ३६ वर्षीय महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. भिषेक गुप्ता याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.
















