- आयुक्तांकडून त्या पाच अधिकाऱ्यांकडे मोठी जबाबदारी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेचा राज्य शासन तसेच सर्वोच्च व उच्च न्यायालय संबंधित तसेच, इतर कामकाजासाठी समन्वय साधण्यासाठी स्वतंत्र समन्वय कक्ष स्थापन करण्यात आला आहे. त्याची पाच अधिकाऱ्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
त्या कामासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी उपायुक्त चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त वामन नेमाणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, कार्यकारी अभियंता थॉमस नरोला यांची निवड केली आहे. कायदा विभागाचे उपायुक्त इंदलकर यांच्याकडे सर्वोच्च व उच्च न्यायालय संबंधित उपस्थित होणाऱ्या बाबी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सोपविली आहे.
सहायक आयुक्त नेमाणे यांच्याकडे पालिकेचे सामायिक धोरण व उपस्थित होणाऱ्या समन्वयाच्या बाबी तसेच, विधानमंडळ कामकाजाच्या दृष्टीने उपस्थित होणाऱ्या बाबींचे कामकाज त्यांच्याकडे सोपविले आहे. मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी पोमण यांच्याकडे महत्वाच्या बैठकांकरीता माहिती मागविणे, माहिती तयार करणे, कागदपत्रांची शहानिशा करणे, ई – मेल करणे, व्हॉट्सअॅपद्वारे संदेश पाठविणे आदी कामांची जबाबदारी देण्यात आली आहे. कार्यकारी अभियंता नरोला यांच्याकडे राज्यातील सर्व महापालिकांना वैयक्तिकरित्या फोनद्वारे संपर्क साधून माहिती मागविण्याचे काम देण्यात आले आहे.













