न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २९ जानेवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय अतिक्रमण पथकाने पिंपरीतील नेहरूनगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या फूटपाथवरील १५ टपऱ्या, ४ रसवंती गृह, ३२ फुटपाथवरील अतिक्रमणे तसेच हातगाड्यावर कारवाई केली.
सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली प्रशासन अधिकारी नाना मोरे यांच्या नेतृत्वात बीट निरीक्षक संतोष शिरसाठ, प्रसाद आल्हाट, शेवलकर योगेश निवृत्ती गुणवरे, शितल भोसले, दिपाली जगदाळे, राजश्री सातळीकर, प्रियंका शिंदे, अतिक्रमण निरीक्षक ज्ञानेश्वर केळकर, सुपरवायझर पंकज वाघे, तृप्ती महांडुळे, क प्रभाग अतिक्रमण पथक, महाराष्ट्र सुरक्षा बल व महाराष्ट्र पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.











