- नगरसेवक उत्तम केंदळेंची टिका; विद्यूत दाहिनीचे काम दोन वर्षात भाजपमुळेच मार्गी
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३१ जाने.) :- निगडीतील अमरधाम स्मशानभूमीतील विद्युतदाहिनी गेल्या काही महिन्यांपासून बंद होती. विद्युत दाहिनीअभावी नागरिकांचे हाल होत होते. त्यासाठी विद्युतदाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. त्यासाठी स्थायी समितीमार्फत तरतूद करून त्या कामाला स्थायी समिती सभेने नुकतीच मंजुरी दिली, परंतु या कामाचा पाठपुरावा केल्याचे सांगत श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न मनसे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी केला आहे. त्याचा हा प्रयत्न म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या मारण्याचा प्रकार असून, हे काम भाजपच्या दोन वर्षाच्या प्रयत्नामुळे मार्गी लागले आहे, अशी टिका नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी केली आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘फ क्षेत्रिय’ कार्यालयाअंतर्गत निगडीतील अमरधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी बसविण्यात आली आहे. विद्युत दाहिनीस १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. विद्युत दाहिनीचे आयुष्य संपले आहे. त्यामुळे विद्युतदाहिनी वारंवार नादुरुस्त होत आहे. नादुरुस्त झाल्यावर महिना-महिनभर दाहिनी बंद ठेवली जात होती. त्यामुळे नागरिकांचे हाल होत होते. त्यासाठी महापालिकेने तातडीने अमरधाम स्मशानभूमीत विद्युतदाहिनी सुरु करण्याची मगाणी नागरिकांची होती. तसेच निगडीतील अनेक माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्था मागील ७-८ वर्षापासून करत होते सर्वाना हे यश आमच्या दोन वर्षाच्या काळातच मिळाले
मनसे शहराध्यक्ष व सध्या नगरसेवक असलेले सचिन चिखले यांच्या पत्नी आश्विनी चिखले मागील पंचवार्षिकमध्ये नगरसदस्या होत्या. परंतु सचिन चिखले यांना त्यावेळी प्रयत्न करूनसुद्धा हे काम मार्गी लावता आले नाही. अमरधाम स्मशानभुमीतील विद्युतदाहिनीचे आयुष्य १० वर्षाचेच होते. विद्युत दाहिनीला १५ वर्ष पूर्ण झाली. त्यामुळे नवीन दाहिनी बसविण्यासाठी मी प्रशासनाकडे पत्र्यवहार केला.
मी सदस्य असताना माजी स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे यांनी अर्थसंकल्प सादर करताना माझ्या सुचविलेल्या कामाचा समावेश करुन घेतला. या कामाच्या लेखाशीर्ष वर २० लाख रुपयांची तरतूद मंजूर करून घेतली होती. त्यानंतर कामाची निविदाप्रक्रिया होऊन विद्यमान स्थायी समितीने त्याला मंजुरी दिली आहे. हा सगळा खटाटोप नागरिकांसाठी आम्ही केला आहे. चिखले यांनी फक्त पत्रव्यवहार केला. आयुक्ताना नुसती निवेदन आणि चर्चा करुन कामे होत नाहीत. त्यांनी प्रशासकीय कामासाठी कोणता पाठपुरावा केला? हे दाखवून द्यावे. त्यामुळे सचिन चिखले यांनी या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करून नागरिकांची दिशाभूल करू नये, असे प्रा. उत्तम केंदळे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.











