न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- थेरगाव येथील तरुणी ही इन्स्टग्राम या मोबाईल अॅप्सवर ‘थेरगाव क्वीन’ नावाचे अकाउंट चालवते. या तरुणीने आरोपी कुणाल कांबळे आणि आरोपी तरुणीसोबत व्हिडिओ तयार करून व्हायरल केले. या व्हिडिओमध्ये धमकीवजा तसेच अश्लील भाषेचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. त्यामुळे समाजातील मुला-मुलींची नितीभ्रष्ट होण्यास व मानसिक स्थिती बिघडविण्यास कारणीभूत होत असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
‘थेरगाव क्वीन’ हे अकाउंट चालविणाऱ्या तरुणीला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. यातील आरोपी कुणाल कांबळे याच्या मागावर पोलीस होते. आरोपी कुणाल हा जंगली महाराज रोड, चौपाटी, शिवाजीनगर, पुणे येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सामाजिक सुरक्षा विभागाच्या पाेलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन अटक केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने बुधवारी (दि. २) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही कारवाई केली. कुणाल राजू कांबळे (वय २६, रा. नाडे गल्ली, गणेशपेठ, पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह दोन तरुणींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या ‘भाई’ने गयावया करत माफी मागितली. असे व्हिडिओ परत करणार नाही, असेही तो म्हणाला. कुणाल राजू कांबळे (वय २६, रा. नाडे गल्ली, गणेशपेठ, पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह दोन तरुणींच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


















