न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०३ फेब्रुवारी २०२२) :- महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप प्रभाग रचना आराखड्यावर तीन हरकती आल्या आहेत. यामध्ये प्रभागाची व्याप्ती वाढविण्याबाबतच्या दोन आणि नैसर्गिक नाल्यानुसार सीमा करण्याची मागणी करणारी एक याचा समावेश आहे.
प्रभागाच्या नावाच्या व्याप्तीमध्ये वाढ करावी, प्रभाग क्रमांक १७ वल्लभनगर, एच. ए. कॉलनी, संत तुकारामनगर, महात्मा फुलेनगरच्या नैसर्गिक नाल्यानुसार सीमा कराव्यात अशा या हरकती असल्याचे निवडणूक सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर यांनी सांगितले. या हरकतींवर २६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.
प्रभाग रचना निवडणूक कार्यक्रम…
- निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणे व त्यास प्रसिद्धी देणे – मंगळवार (दि. १ फेब्रुवारी २०२२)
- प्रारूप अधिसूचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी – मंगळवार ते सोमवारी (दि. १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी २०२२)
- प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे – बुधवारी (दि. १६ फेब्रुवारी २०२२)
- राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत हरकती व सुचनांवर अंतिम सुनावणी – शनिवारी (दि. २६ फेब्रुवारी २०२२)
- सुनावणीनंतर शिफारशी विहीत नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणे – बुधवारी (दि. २ मार्च २०२२)


















