न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ४ फेब्रुवारी २०२२) :- ऑल इंडिया मजलिस ए इतेहाद्दूल मुस्लिमीन AIMIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी हे मेरठ येथील जनसभा करून दिल्लीला परत येत असताना काही भ्याड हल्लेखोरांनी त्यांच्या गाडीवर ४ राउंड गोळ्या फायर केल्या. या घटनेचा पिंपरी चिंचवड शहर एमआयएमच्या वतीने पिंपरीतील बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शने करीत निषेध व्यक्त करण्यात आला.
खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांचावर झालेला प्राणघातक गोळीबार हा मोदी-योगी-शहा सरकारचे देशात शांतता प्रस्थापित करण्यात अपयशी ठरल्याचे चिन्ह आहे. केंद्र सरकारने तात्काळ उच्च दर्जाची झेड प्लस सुरक्षा त्यांना द्यावी. आरोपींचा तात्काळ शोध घेऊन त्या हल्लेखोरांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
एमआयएमचे प्रदेश महासचिव अकील मुजावर, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष धम्मराज साळवे, एमआयएम नेते शफिउल्ला काझी, अब्दुल रोफ कुरेशी, युवा नेते खालिद मुजावर, पुणे जिल्हाध्यक्ष फैयाज शेख, महिला शहराध्यक्ष रुहीनाज शेख, महासचिव मौलाना अब्दुल शंकर खान, अर्चना परब आदीपदाधिकारी, सदस्य व स्थानिक नागरिक महिला उपस्थित होत्या.


















