न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२२) :- शिवसेनेतून काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या गजानन चिंचवडे यांचे आज (शनिवारी) आकस्मिक निधन झाले. त्यांचे वय ५२ होते. हृदयविकाराचा धक्का आल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय. नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांचे ते पती होत.
गजाजन चिंचवडे मित्राच्या सदनिकेवर गेले होते. तिथे बाथरूममध्ये पडलेल्या अवस्थेत ते आढळले. त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी काम केले. काही महिन्यांपूर्वी चिंचवडे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित चिंचवडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या पत्नी अश्विनी चिंचवडे शिवसेनेकडून सलग दोनवेळा नगरसेविका आहेत.


















