न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०६ फेब्रुवारी २०२२) :- तुमच्यावर कोणीतरी करणी केली असल्याचे आरोपीने फिर्यादी यांना सांगितले. त्यासाठी अघोरी व गुप्त पूजा करावी लागेल. अन्यथा मृत्यू होईल अशी भीती दाखवली. त्यानंतर अघोरी पूजेसाठी फिर्यादीकडून सात लाख २१ हजार ४९१ रुपये ऑनलाइन व रोख स्वरूपात घेतले.
५२ वर्षीय व्यक्तीने चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फसवणूक व महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समूळ उच्चाटन करणेबाबत अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार चिंचवड येथे घडला. किमदेवांशी सोलंकी (रा. उद्योगनगर, चिंचवड) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत