- वाहनांची योग्यता तपासणी व इतर टेस्ट विना अडथळा…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०७ जानेवारी २०२२) :- पिंपरी – चिंचवड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास नव्याने मिळालेल्या जागेवर पहिल्या टप्प्यातील कामकाज सुरू झाले आहे. या ठिकाणी वाहनांची योग्यता तपासणी करण्यात येत आहे. दररोज जवळपास २५० वाहनांची तपासणी विनाअडथळा होत आहे. सध्या सुरू असलेल्या आरटीओच्या जागेवरील तपासणीचा अडथळा दूर झाला आहे.
चिखली येथील गट नंबर ५३९ येथील पेठ क्रमांक १३ येथे चार हेक्टर जागा आरटीओ कार्यालयासाठी देण्यात आली आहे. गायरानाची जमीन ही सर्व प्रक्रिया पार पाडून ताब्यात देण्यात आली. गेल्या दोन वर्षापासून या जागेसाठी शासनाकडे आरटीओ विभाग पाठपुरावा करीत होता. या जागेवर ब्रेक टेस्ट ट्रॅक व वाहन योग्यता तपासणी करण्यात येणार आहे. तसेच , या ठिकाणी पार्किंग व इतर काही विभाग टप्प्याने सुरू करण्यात येणार आहेत.
उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे म्हणाले, नवीन जागा ताब्यात आल्यानंतर योग्यता प्रमाणपत्र तपासणीची प्रक्रिया या ठिकाणी २६ जानेवारीपासून सुरू करण्यात आली आहे. वाहतुकीसाठीचे अवजड वाहनांचे व्हिजल इन्स्पेक्शन या अंतर्गत सर्व तपास येथे करण्यात येत आहे.


















