- रावेतच्या बास्केट ब्रिजवरील घटना…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२२) :- रावेत येथील पुलावरून कार पवना नदीत पडली. ही घटना रविवारी (दि. ६) रात्री घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री बास्केट ब्रिजवरून एक कार जात होती. कारला एक श्वान आडवा आला. त्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार नदीत पडली. पुलाचा कठडा तोडून कार पवना नदीत पडली.
दरम्यान कारच्या एअरबग उघडल्या. यामुळे चालकाला लागले नाही. चालक अपघातात सुखरूप आहे. घटनेची माहिती मिळताच वाकड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी कार नदीतून बाहेर काढली आहे.
















