- पिंपरी पोलिसांकडून दोघांना अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२२) :- मुलीला एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा होता. त्यांना यासंदर्भातील काम करुन देतो असं सांगणाऱ्या आरोपींचा मोबाईल नंबर मिळाल्यानंतर त्यांनी यावर संपर्क साधला.
दोन्ही आरोपींनी फिर्यादींचा विश्वास संपादन केला. फिर्यादी महिलेने पैसे देऊन आपल्या मुलीचं मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचं निश्चित केलं. त्यानुसार या महिलेला ४५ लाख रुपयांमध्ये तुमच्या मुलीला मेडिकलसाठी प्रवेश मिळवून देऊ असं सांगण्यात आलं.
फिर्यादी महिलेने आरोपींवर विश्वास ठेवला आणि पहिल्यांदा १० लाख आणि दुसऱ्या वेळेस ३५ असे एकूण ४५ लाख रुपये आरोपींना दिल्याचा उल्लेख तक्रारीमध्ये आहे. मात्र एवढे पैसे देऊनही मुलीला प्रवेश न मिळाल्याने या ४२ वर्षीय महिलेला आपली आर्थिक फसवणूक झाल्याचं समजताच तिने आरोपींविरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणी किरण सुवर्णा आणि कॉलेज प्रमुख आयएसएनआर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. अधिक तपास पिंपरी पोलीस करत आहेत.
















