- गंभीर जखमी तरुणाचा अपघातात मृत्यू…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२२) :- जुन्या पुणे – मुंबई महामार्गावरील बीआरटी मार्गातून खाजगी वाहनांना प्रवेश बंदी आहे. तरीदेखील दुचाकीस्वाराने त्याची दुचाकी पालिकेच्या पिंपरी चौकाजवळील बीआरटी मार्गातून नेली.
बीआरटी मार्गात लावलेल्या दोरीला अडकून त्याची दुचाकी पडली. यामध्ये तरूण गंभीर जखमी झाला. त्याच्या दुचाकीचे मोठे नुकसान झाले. अपघातात त्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात ३ फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता घडला.
रामजनम अभिमन्यू विश्वकर्मा (वय ३२, रा. गांधीनगर झोपडपट्टी पिंपरी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रशांत आप्पा करे (वय ३७, रा. जुनी सांगवी) यांनी सोमवारी (दि. ४) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


















