न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महानरपालिका व ठेकेदाराकडून साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांची पिळवणूक केली जात आहे. या बाबत सातत्याने निवेदन देऊनही दुर्लक्ष करण्यात आले. त्याविरोधात संतप्त होत सफाई कर्मचाऱ्यांनी महापालिकेवर आंदोलन छेडले. या वेळी ठेकेदर महापालिकेच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.
कष्टकरी जनता आघाडीचे अध्यक्ष बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळीकष्टकरी कामगार पंचायत कार्याध्यक्ष बळीराम काकडे, सफाई कामगार संघटनेच्या नेत्या मधुरा डांगे, कष्टकरी जनता महीला आघाडीच्या मलानताई गवई, गौरी प्रमोद सेलर हे उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने १६०० महिला व पुरुष सातत्याने रस्ते झाडलोट साफसफाई व इतर कामे कंत्राटी पद्धतीने करत आहेत. गेले दहा ते पंधरा वर्षापासून ही कामे सातत्याने सुरू आहेत. यात ठेकेदार बदलत असून मूळ कामगार मात्र तेच आहेत. नवीन ठेकेदार पद्धतीमुळे कामगारांचे शोषण व आर्थिक पिळवणूक होत आहे. साफसफाई कामगारांच्या बचत खाते विभाग २० ते ३० व्यक्ती कामे विभागून देण्यात यावे अशी आमची आग्रही भूमिका आहे. जोपर्यंत हा ठेका रद्द होत नाही तोपर्यंत लढा देऊ, असे बाबा कांबळे म्हणाले.











