- निवडणूक विभागाकडे एकाच दिवशी तब्बल ६५ हरकती…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२२) :- निवडणुकीसाठी जाहीर केलेल्या प्रारूप प्रभाग रचनेवर हरकती सूचना मागविल्या आहेत. मंगळवारी एकाच दिवशी तब्बल ६५ हरकती निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या आहेत. प्रभाग रचना करताना रेल्वे मार्ग, रस्ते, नाले ओलांडून आणि एकसंध भागाचे तुकडे केल्यावरून आजी माजी नगरसेवकांनी आक्षेप नोंदवले आहेत.
प्रारुप आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती घेण्यासाठी १४ फेब्रुवारीपर्यंत मुदत आहे. प्रभाग क्रमांक १७ वल्लभनगर व संत तुकारामनगर, प्रभाग क्रमांक ४२, प्रभाग क्रमांक १९, चिंचवड स्टेशन अशा तीन हरकती पहिल्या तीन दिवसात घेतल्या. शुक्रवारी ९ हरकती निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या होत्या. मंगळवारी तब्बल ६५ हरकती आल्या. आतापर्यंत महापालिकेकडे ७७ हरकती नोंदविल्या आहेत.
महापालिकेच्या प्रभाग रचनेच्या हरकती सूचनांच्या सुनावणीसाठी राज्याचे सहकार आयुक्त अनिल कवडे यांची राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे.












