न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२२) :- शहरातील नागरिकांना थकबाकी नसल्याचा दाखला मिळविण्यासाठी अर्ज व दाखला प्राप्त करून घेण्यासाठी कर संकलन विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. नागरिकांची होणारी गैरसोय व वेळेचा अपव्यय या बाबी विचारात घेऊन, कर संकलन विभागाकडून महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेत स्थळावर मालमत्ता कर थकबाकी नसलेचा ऑनलाईन दाखला उपलब्ध करून देण्यात आला आहे.
पालिकेच्या संकेत स्थळावरील मुख्य पृष्ठावरील नागरिक या लिंकमध्ये मिळकत कर दाखला लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. मालमत्ता कर थकबाकी नसलेचा दाखला ऑनलाईन पध्दतीने देणेत येणार असल्याने नागरिकांना घर बसल्या दाखला प्राप्त होणार असलेने मोठा दिलासा मिळणार आहे.
भविष्यात नागरिकांच्या सोईसाठी लोकसेवा हमी कायद्यातील करसंकलन विभागाशी निगडीत सेवा ऑनलाईन पध्दतीने देण्याबाबत उपाययोजना करण्यात येणार आहेत. असुन त्याबाबतची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना करसंकलन विभागाशी निगडीत सर्व सेवांचा लाभ ऑनलाईन पध्दतीने देणेत येईल, असे पालिकेच्या करसंकलन विभागाने पत्रकाद्वारे कळविले आहे.












