न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२२) :- भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सिनेसृष्टीतील ज्येष्ठ कलावंत रमेश देव, माजी खासदार गजानन बाबर, नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे यांचे पती गजानन चिंचवडे, उपअभियंता हेमंत देसाई यांचे वडील प्रभाकर देसाई व उपअभियंता राजेंद्र जावळे यांचे वडील कुंडलीक जावळे यांचे निधन झाले.
त्यामुळे आज बुधवारची स्थायी समितीची सभा त्यांना श्रद्धांजली वाहून बुधवार दिनांक सोळा फेब्रुवारी पर्यंत तहकूब करण्यात आली आहे, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.











