- ‘कोव्हिशिल्ड’ ‘कोव्हॅक्सिनचे डोसेस स. ९.३० ते सायं. ४.३० यावेळेत उपलब्ध…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२२) :- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अ, ब, क, ड, इ, फ, ग, ह या प्रभागवार पद्धतीने ६२ लसीकरण केंद्रावर २०५०० किंवा प्रतिदिन उपलब्ध लसीच्या साठयानुसार वय वर्ष १५ व पुढील सर्व नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ व ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस (कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ३० टक्के लाभार्थी आणि ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ७० टक्के लाभार्थी) या पध्दतीने देण्यात येणार आहे.
या लसीकरण अंतर्गत दुसरा व प्रिकॉशन डोसचा लाभ घेण्यासाठी शासनाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार निकष पुर्ण केलेल्या लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल. वय १५ वर्षावरील सर्वाना ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस हा ३१०० क्षमतेने तर, वय १८ वर्षावरील सर्व लाभार्थीना ‘कोव्हिशिल्ड’ लसीचा पहिला, दुसरा व प्रिकॉशन डोस १७४०० क्षमेतेने देण्यात येणार आहे. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी लसीचा कोटा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग पध्दतीने ३० टक्के लाभार्थी, ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने ७० टक्के लाभार्थी असा असणार आहे.
ज्या नागरिकांचा ‘कोव्हिशिल्ड’ व ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस निश्चित केलेले दिवस पूर्ण झालेनंतर ही बाकी आहे त्यांनी पिं.चि.मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली किंवा कोविन अॅपव्दारे ऑनलाईन स्लॉट बुकिंग करण्याची आवश्यकता नसून त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप पध्दतीने लसीकरण करण्यात येईल.
सर्व लाभार्थ्यांचे लसीकरण सकाळी ९.३० ते सायं. ४.३० या कालावधीत करण्यात येईल. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रावर जेष्ठ नागरिक, दिव्यांग व तृतीयपंथी पिं. चि. मनपा वार्डनिहाय केंद्रीय KIOSK टोकनप्रणाली नोंदणी केलेल्या लाभार्थ्यांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात येईल. कोविन अॅपवर नोंदणी करण्यासाठी प्रतिदिन सकाळी ८.०० वाजता स्लॉट बुकींग ओपन करण्यात येतील. तसेच स्तनदा व गरोदर महिलांचे कोविड-१९ लसीकरण करणेकामी आठ लसीकरण केंद्रावर काही डोस राखीव ठेवण्यात येत असून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन ऍप या पध्दतीने लसीकरण करण्यात येईल. आठवड्यातील दर बुधवारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची सर्व लसीकरण केंद्र साप्ताहिक सुट्टी करण्याच्या दृष्टीने बंद राहतील याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी.












