- शासकीय कामात अडथळा; भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०९ फेब्रुवारी २०२२) :- डॉक्टर व रुग्णांना शिवीगाळ करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार फिर्यादी हे स्टाफसह रुग्णालयात गेले असता आरोपीने पोलिसांना शिवीगाळ केली. तुम्ही सर्व पोलिस हरामखोर आहात, तुमची नोकरी घालवतो अशी धमकी दिली.
फिर्यादीच्या गणवेशाची कॉलर पकडून फिर्यादीला धक्काबुक्की करीत, शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना मंगळवारी (दि. ८) रात्री गव्हाणेवस्ती येथील मंकीकर रुग्णालयात घडली.
विजय वसंत गायकवाड (रा. काटेपुरम चौक, पिंपळे गुरव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोन्या चासकर याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे भोसरी पोलिस ठाण्यात शिपाई पदावर कार्यरत आहेत. याप्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.












