- दगडफेक तसेच वाहनांच्या काचा फोडल्या; गुन्हा दाखल…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १० फेब्रुवारी २०२२) :- व्यवसायिक वादातून विठ्ठल शेलार याने आरोपी सिद्धेश्वर हगवणे याला पिस्तुलाचा धाक दाखवून धमकी दिली होती. म्हणून, शरद मोहोळ याच्या सांगण्यावरून सिद्धेश्वर, मल्हारी, आलोक, यांनी विठ्ठल शेलार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आरोपींनी विठ्ठल शेलार समजून गाडीमधून पळून जाणाऱ्यांना साथीदारांवर दगडफेक आणि कुंड्या फेकून मारल्या. यात ते गंभीर जखमी झाले आहेत, असं पोलीस तक्रारीत म्हटलं आहे.
तसेच राधा हॉटेल येथून जाणाऱ्या लोकांची पर्वा न करता सार्वजनिक रस्त्यावर देखील शरद मोहोळच्या टोळीने दगडफेक करून वाहनांच्या काचा फोडल्या आहेत.
पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेप्रकरणी शरद हिरामण मोहोळ, आलोक शिवाजी भालेराव, मल्हारी मसुगडे आणि सिद्धेश्वर बाहु हगवणे अशी आरोपींची नावे आहेत. यांच्यासह इतर ५-६ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.












